PAN-Aadhaar शिवाय तुम्ही किती सोने खरेदी करू शकता? दिवाळीत सोने खरेदी करण्यापूर्वी हे नियम जाणून घ्या

buy gold without pan card
buy gold without pan card

Buy Gold Without Pan Card :भारतात दिवाळीला सोने खरेदी करण्याची परंपरा आहे. दिवाळीचा शुभ दिवस साधून आपण सोने खरेदी करतो. यंदा दिवाळीसोबत लग्नाचाही हंगाम आहे. त्यामुळे या वेळी लोक मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करत आहेत, त्यामुळे जस जशी दिवाळी जावळ येत आहे तशी सोन्याची मागणीही दिवसेंदिवस वाढत आहे.

पण पेन आणि आधार कार्डशिवाय तुम्ही एकावेळी किती सोने खरेदी करू शकता हे तुम्हाला माहिती आहे का? जर नसेल तर चला जाणून घेऊया सोने खरेदीशी संबंधित काही नियम आणि कायदे.

सोने खरेदी आणि सोने जवळ ठेवण्याशी संबंधित आयकर आणि इतर काही सरकारी नियम आहेत. जे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही या नियमांचे उल्लंघन केले तर तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता. चला तर मग जाणून घेऊया या नियमांबद्दल.

PAN-Aadhaar शिवाय तुम्ही किती सोने खरेदी करू शकता

आधार आणी पॅन कार्डशिवाय सोने खरेदी करण्याची मर्यादा

जाणून घ्या किती सोने खरेदी करण्यासाठी तुम्हाला पॅन आणी आधार कार्ड दाखवावे लागेल…

तुम्ही 2 लाख रुपये किंवा त्याहून अधिक किमतीचे सोने खरेदी केल्यास तुम्हाला पॅन किंवा आधार कार्ड दाखवावे लागेल. सोन्यावरील हा नियम आयकर कलम 114B अंतर्गत संपूर्ण देशात लागू आहे. 1 जानेवारी 2016 पूर्वी, जर तुम्ही 5 लाख रुपयांच्या वर सोने खरेदी केले तर त्यानंतर तुम्हाला पॅन किंवा आधार कार्ड दाखवावे लागत होते.  मात्र आता हा नियम बदलून पॅन कार्डशिवाय सोने खरेदी करण्याची मर्यादा दोन लाखांवर आणण्यात आली आहे. काळा पैसा रोखण्यासाठी हा नवा नियम लागू करम्यात आला आहे.

Share This Article
Navigating Gold Price Trends: February 23, 2024 Insights NYT Connections Today: Hints & Answers for February 23, 2024 Valentine Week 2024: Complete Calendar of Important Dates from 7th to 14th February Top 10 Largest U.S. Cities by Population 2024 Top 10 Best Pizza Places in NYC 2024