LIC Aadhaar Shila Policy: 87 रुपयांच्या रोजच्या बचतीवर 11 लाखांचा परतावा, पूर्ण माहिती जाणून घ्या

LIC Aadhaar Shila Policy
LIC Aadhaar Shila Policy

LIC Aadhaar Shila Policy : LIC मध्ये गुंतवणूक करणे हा गुंतवणूकदारांसाठी नेहमीच एक सुरक्षित व फायदेशीर व्यवहार आहे आणि अनेक गुंतवणूकदारांनी एलआयसीमध्ये गुंतवणूक करून लाखो रुपये कमावले आहेत. एलआयसीच्या आधार शीला पॉलिसीमध्येही पॉलिसीधाकांना बरेच फायदे मिळतात. या पॉलिसीमध्ये, ग्राहकांना छोट्या दैनंदिन गुंतवणुकीवर मोठ्या परताव्याचा लाभ मिळतो.

LIC ची आधार शीला पॉलिसी पॉलिसीधाकांना जीवन संरक्षण प्रदान करते आणि पॉलिसी धारकाचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य देखील प्रदान करते.

LIC च्या आधार शीला पॉलिसीचे फायदे काय आहेत?

परिपक्वतेचा लाभ एलआयसीच्या आधार शीला पॉलिसीमध्ये उपलब्ध आहे. LIC च्या ईतर पॉलिसिज प्रमाणेच LIC ची आधार शीला पॉलिसी देखील उच्च व्याज दर देते.

कोण अर्ज करू शकतो

भारतातील कोणताही नागरिक एलआयसीच्या आधार शीला पॉलिसीसाठी अर्ज करण्यास पूर्णपणे मुक्त आहे आणि अर्ज करण्याची वयोमर्यादा LIC द्वारे 8 ते 55 वर्षे निश्चित केली गेली आहे. एलआयसीच्या आधार शीला पॉलिसीमध्ये, मॅच्युरिटी वय 70 वर्षे निश्चित केले आहे आणि ही पॉलिसी 10 ते 20 वर्षांच्या कालावधीत परिपक्व होते.

तुम्ही एलआयसीच्या आधार शीला पॉलिसीमध्ये गुंतवणूक करत असाल, तर तुम्हाला मॅच्युरिटीवर 11 लाख रुपयांचा परतावा मिळू शकतो. समजा, जर तुम्ही 15 ते 25 वर्षे मुदतीच्या या पॉलिसीमध्ये दररोज 87 रुपये सलग वर्षभर जमा केलेत तर तुमचे या पॉलिसित वार्षिक एकूण 31755 रुपये जमा होतील.

या व्यतिरिक्त जर तुम्ही 10 वर्षे हीच गुंतवणूक केली तर ही रक्कम 3 लाख 17 हजार 550 रुपयांपर्यंत वाढते. आता अशा परिस्थितीत, जर ही पॉलिसी वयाच्या ७० व्या वर्षी मॅच्युअर झाली, तर एलआयसीकडून तुम्हाला एकूण ११ लाख रुपयांचा परतावा दिला जातो. आणि या कारणास्तव बरेच लोक या पॉलिसीमध्ये गुंतवणूक  करतात. रोजची 87 रुपयांची गुंतवणूक करणे कोणालाही सहज शक्य होते.

Share This Article
Navigating Gold Price Trends: February 23, 2024 Insights NYT Connections Today: Hints & Answers for February 23, 2024 Valentine Week 2024: Complete Calendar of Important Dates from 7th to 14th February Top 10 Largest U.S. Cities by Population 2024 Top 10 Best Pizza Places in NYC 2024